आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

आसाम, २४ नोव्हेंबर २०२०: आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांनी सोमवारी सायंकाळी गुवाहाटी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती आधीपासूनच चिंताजनक असल्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपला डिब्रूगढ दौरा मध्येच सोडत पुन्हा गुवाहाटी मध्ये परतले.

राज्याचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आपला कार्यक्रम रद्द करून डिब्रूगढहून गुवाहाटीला परत आले. त्यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली होती की ‘तरुण गोगोई हे माझ्या वडिलांसारखेच आहेत, मी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहे. मी माझे सर्व दौरे रद्द करून डिब्रूगढ वरून पुन्हा गुवाहाटी ला निघालो आहे. जेणेकरून मी त्यांच्यासोबत व त्यांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवू शकंल. कारण त्यांची प्रकृती सातत्यानं बिघडत चालली आहे.’ तरुण गोगई हे २००१ पासून ते २०१६ पर्यंत आसामचे मुख्यमंत्री होते.

तथापि, रविवारी बातमी मिळाली की, ८६ वर्षीय तरुण गोगोई यांच्या प्रकृतीमध्ये थोडा सुधार झाला आहे. गुवाहाटी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलचे (जीएमसीएच) अधीक्षक अभिजित सरमा यांनी सांगितलं की, सध्या ते अर्ध्या शुद्धीत असल्याच्या अवस्थेत आहे. कोविड -१९ मुळं कॉंग्रेसचे दिग्गज नेते गोगोई यांना २ नोव्हेंबरला जीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सरमा यांनी पत्रकारांना सांगितलं की, डॉक्टरांनी पुन्हा सर्व चाचण्या केल्या असून, शनिवारीच्या तुलनेत त्यांची प्रकृती सुधारली आहे.

ते पुढं म्हणाले, आम्ही शनिवारी रात्री सांगितलं की त्याच्यासाठी ४८ तास खूप महत्वाचे आहेत. चोवीस तास उलटून गेले आहेत आणि त्यांची तब्येत काहीच बिघडलेली नाही. ते पुढं म्हणाले की गोगोई यांच्या नाडीचा दर आणि रक्तदाब याची चौकशी चालू आहे आणि त्यांची ऑक्सिजन पातळी ९५-९७ टक्के आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा