बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली

रांची, २२ जानेवारी २०२१: चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरलेल्या आणि रिम्सच्या पेइंग-वॉर्डात उपचार घेत असलेले राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.  रिम्सचे अधीक्षक आणि लालूंवर उपचार देत असलेले डॉक्टर रिम्समध्ये पोहोचले आहेत.  याआधी झारखंडचे आरोग्यमंत्री बन्ना गुप्ताही रिम्समध्ये पोहोचले  आणि त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली.

माजी मुख्यमंत्री लालू यांना २३ डिसेंबर २०१७ रोजी तुरूंगात पाठविण्यात आले होते.  लालू यांनी सुमारे एक महिन्यापूर्वी तुरूंगात 3 वर्षे पूर्ण केली आहेत.  गेल्या अडीच वर्षांपासून त्यांच्यावर रिम्समध्ये उपचार सुरू होते.  त्यांना ६ सप्टेंबर २०१८ रोजी तुरुंगातून उपचारांसाठी रिम्स येथे हलविण्यात आले होते आणि त्यानंतर त्यांचे रिम्समध्ये सतत उपचार सुरू आहेत.  लालू यांना प्रथम रिम्सच्या कार्डिओलॉजी विभागात दाखल करण्यात आले.

आज हायकोर्टत सुनावणी

८ जानेवारी रोजी झारखंड उच्च न्यायालयाने प्रसिद्ध चारा घोटाळ्याप्रकरणी तुरूंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्या तुरूंगात मॅन्युअल उल्लंघन संबंधित खटल्याची सुनावणी केली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने सरकारला जाब विचारला.  झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह यांच्या खंडपीठासमोर सर्व पक्षांनी आपला मुद्दा मांडला.  सरकारनेही त्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली.

न्यायमूर्ती अपरेशकुमार सिंग यांनी सरकारला आणखी काही मुद्यांवर उत्तर देण्यास सांगितले.  तसेच, २२ जानेवारीला लालू यादव यांच्या प्रकृतीसंदर्भातील मुद्यावर सुनावणीसाठी तारीख निश्चित केली आहे.  या प्रकरणाची पुढील सुनावणी आज म्हणजेच शुक्रवारी (२२ जानेवारी) होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा