पंढरपूर ३० ऑक्टोबर २०२३ : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने आंदोलन सुरू केले असून या आंदोलनामध्ये गावोगावी मराठा युवकांनी पुढार्यांना गावबंदी केली आहे. त्यामुळे पुढाऱ्यांवर आपले नियोजित कार्यक्रम सोडून घरी बसण्याची वेळ आलीय. परंतु याला बगल देत आज पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे, भाजपाचे नेते सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सांगोला येथे कार्यक्रमाला जात असताना खर्डी येथील मराठा आंदोलकांशी आरक्षणासंदर्भात चर्चा केली.
यावेळी मराठा समाज बांधवांनी आमच्या भावना आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवा अशी मागणी परिचारक यांच्याकडे केली. त्यावर भाजपाचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आपले मत व्यक्त करताना आंदोलकांना सांगितले की, मराठा समाज बांधवांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवाव्यात. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी : नवनाथ खिल्लारे