माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर निवड

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या शिफारसीनुसार माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई
यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. राष्ट्रपती नामनिर्देशीतील खासदार म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपतींना राज्यसभेच्या एकूण १२ खासदारांची निवड करण्याचा अधिकार असतो. यापैकी एक जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी राष्ट्रपतींनी रंजन गोगोई यांची निवड केली आहे. गृहमंत्रालयाने सोमवारी अधिसूचना काढून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

रंजन गोगोई यांचं नामांकन राष्ट्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून दाखल करण्यात आल आहे. गोगोई यांचा अयोध्या राम मंदिरासह अनेक महत्वाच्या प्रकरणांच्या सुनावणीत सहभाग होता. रंजन गोगोई यांची ३ ऑक्टोबर २०१८ रोजी यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते  १७ नोव्हेंबर २०१९ रोजी निवृत्त झाले. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही कर्तव्य बजावले आहे. २०१२ नंतर गोगोई यांनी सर्वोच न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहिले.

सरन्यायाधीश बनणारे रंजन गोगोई हे ईशान्य भारतातील पहिली व्यक्ती आणि पहिले आसामी नागरिक आहेत. गोगोई यांचे वडील केशब चंद्र गोगोई हे १९८२ साली आसामचे मुख्यमंत्री होते. १२ जानेवारी २०१८ रोजी भारताच्या इतिहास पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली. त्या चार न्यायाधीशांमध्ये रंजन गोगोईही होते. न्यायालयातील प्रकरणांच्या वाटपावरुन या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषदेतून खंत व्यक्त केली होती.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा