पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ‘ईडी’ च्या आरोप पत्रात माजी मुख्यमंत्री असा उल्लेख

मुंबई, २० सप्टेंबर २०२२ : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडी ४ हजार पाणी आरोप पत्र दाखल केल आहे, तर पत्राचाळ प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आला आहे. पण यामध्ये आता एक नवीन ट्विस्ट समोर आलंय, पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ED ने आरोप पत्रात एका माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री नक्की कोण आहेत त्यांचं नाव अद्याप समोर आलं नाही.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ED ने आपल्या आरोप पत्रात दोन महत्त्वाच्या गोष्टी मांडल्या आहेत. यामध्ये २००६-२००७ या कालावधीत तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक पार पडली होती आणि या बैठकीनंतर गुरु आशिष कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने राकेश वाधवान, सारंग वाधवान, यांना सोबत घेऊन म्हाडा सोबत कंत्राट घेतले असे सांगितले आहे. पण माजी मुख्यमंत्री कोण हे त्यांच्या नावाचा उल्लेख ED ने आरोप पत्रात केला नाही. या घोटाळ्यात १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असे EDने आरोप पत्रात सांगितले आहे

तसेच ED च्या आरोप पत्रात पत्राचाळ प्रकरणातील घडामोडीची माहिती संजय राऊत यांना माहित होती, आणि या संपूर्ण घोटाळ्याचे सूत्रधार हे संजय राऊत आहेत, आरोप पत्रात राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचं ही सांगितलं आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार संजय राऊत आणि वाधवान बंधू सोबत संगनमत करून पत्राचाळ घोटाळा प्रकरणातून पैसे कमावले आहे, असे आरोप पत्रात सांगितले आहे. तसेच प्रमुख आरोपी हे संजय राऊत आहे आणि घोटाळा गुरू आशिष कंट्रक्शन कंपनीत झाला आहे. असे ED च्या आरोप पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ होत आहे आणि त्यांना जामीन मिळण्याची शक्यता कमी आहे. पण माजी मुख्यमंत्री कोण हे आद्याप स्पष्ट झालेले नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा