छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन

छत्तीसगढ, दि. २९ मे २०२०: छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अजित जोगी यांना हदय विकाराच्या झटक्या नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना गेल्या २० दिवसापासून रायपूरच्या रुग्णालयात दाखल केले गेले होते. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांचे पुत्र अमित जोगी यांनी ट्विट करून दिली आहे.

अमित जोगी यांनी लिहिले की, २० वर्षीय(राज्य उदयास येऊन झालेला काळा) युवा छत्तीसगड राज्याच्या पित्याचा आज आधार निघून गेला आहे. केवळ माझेच पिता नाही तर छत्तीसगडने देखील आपला पिता गमावला आहे. अजित जोगी यांनी आपल्या अडीच कोटी परिवाराला सोडून देवाकडे प्रस्थान केले आहे. गोरगरिबांचा आधार आणि छत्तीसगडचा करता धरता आपल्यापासून खूप दूर गेला आहे.

अजित जोगी यांचे निधन ७४ व्या वर्षी झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीमध्ये चढ-उतार चालू होता. श्वास घेण्यास अडचण होऊ लागल्यामुळे त्यांना ९ मे रोजी रायपूर मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले होते की त्यांना  कार्डियक अरेस्ट झाल्याचे सांगितले होते. त्यांची प्रकृती सातत्याने खालावत होती त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटर वरती ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी त्यांनी स्थलांतरित मजुरांवर ट्विट करत केंद्र सरकारला असे म्हटले होते की, ज्याप्रमाणे विदेशातून तुम्ही लोकांना विमानाने भारतात आणत आहात तसेच स्थलांतरीत मजुरांसाठी आपल्या गावी येण्यासाठी सोय करून द्यावी.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा