मुंबई, २४ सप्टेंबर २०२० :ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डीन जोन्स हा मुंबई येथे इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल)समालोचन करीत होता . जोन्सने ऑस्ट्रेलियाकडून ५२ कसोटी आणि १६४ एकदिवसीय सामने खेळला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी मुंबईत निधन झाले. मृत्यू समयी ते ५९ वर्षांचे होते. या घटनेबाबत समजते की ब्रेट ली यांनी डीन जोन्सना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी झाला. गुरुवारी सकाळी जोन्सने ली आणि निखिल चोप्रासोबत ब्रेकफास्ट केला.
जोन्स यांना कॉमेंट्रीच्या वेळेत हॉटेलच्या लॉबीमध्ये जबरदस्त हृदयविकाराचा झटका आला. स्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून आयपीएलचे प्रसारण आयोजित करणार्या स्टार इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, “डीन मर्व्हिन जोन्स ए.एम. यांचे निधन झाल्याची बातमी आम्हाला समजली त्याचे अतिशय वाईट वाटते. आम्ही त्याच्या परिवाराबद्दल तीव्र संवेदना व्यक्त करतो आणि या कठीण परिस्थितीत त्यांचे समर्थन करण्यास आम्ही तयार आहोत. आवश्यक त्या व्यवस्था करण्यासाठी आम्ही ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तालयाशी संपर्क साधत आहोत. तो एक उत्तम खेळाडू व समालोचक होता.
जोन्सने ऑस्ट्रेलियाकडून ५२ कसोटी सामने खेळले आणि ११ शतकांसह ४६.५५ च्या सरासरीने ३६३१ धावा केल्या. १९८६ च्या कसोटी सामन्यात त्याने भारताविरुद्ध द्विशतक ठोकले होते. जोन्सनेही १६४ एकदिवसीय सामने खेळले आणि ४४.६१ च्या सरासरीने ६०६८ धावा केल्या. तो ऑस्ट्रेलियाच्या १९८७ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. १९८४ मध्ये त्याने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि १९९४ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
“डीन जोन्सच्या दुखद निधनाबद्दल ऐकून मला अतिशय दुःख झाले असून .परमेश्वर त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना शक्ती व धैर्य मिळावे म्हणून मी प्रार्थना केली,” असे ट्विट भारताचा कर्णधार विराट कोहली यांनी केले. “सहकारी आणि प्रिय मित्र – डीन जोन्स गमावल्याचा मला धक्का बसला आहे त्याच्या परिवाराबद्दल मला सहानुभूती आहे असे रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी