गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन

अहमदाबाद, २९ ऑक्टोबर २०२०: गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील दिग्गज नेते केशुभाई पटेल यांचं निधन झालं आहे. गुरुवारी सकाळी श्वास घेण्यात अडचण आल्यानंतर केशुभाई पटेल यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केशुभाई पटेल हे ९२ वर्षांचे होते.

केशुभाई पटेल काही काळापूर्वी कोरोना विषाणूमुळे पॉझिटिव्ह असल्याचं दिसून आलं. राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केशुभाई पटेल यांच्या कुटुंबीयांशी बोलून दुःख व्यक्त केलं.

‌‌ केशुभाई पटेल यांच्या मुलाच्या म्हणण्यानुसार, कोरोनाला मात दिल्यानंतर सुद्धा त्यांची प्रकृती सतत खालावत होती. परंतु, श्वासोच्छवासाच्या समस्येनंतर त्यांना गुरुवारी सकाळी रुग्णालयात नेण्यात आलं असता, त्यांच्याकडून उपचाराला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

केशुभाई पटेल यांनी दोनदा गुजरातचं मुख्यमंत्रीपद भूषविलं, ते १९९५ आणि १९९८ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री झाले. परंतु २००१ मध्ये त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

गुजरातमधील भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते

केशुभाई पटेल हे गुजरातमधील भारतीय जनता पक्षाच्या दिग्गज नेत्यांमध्ये गणले जातात, त्यांनी जनसंघापासून पक्षासाठी काम केलं होतं. विशेष म्हणजे गुजरात मध्ये भाजप कडून पहिले मुख्यमंत्री देखील तेच होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केशुभाई पटेल यांच्यासोबत बराच काळ काम केलं आणि अनेकदा नरेंद्र मोदी केशुभाई पटेल यांचे आशीर्वाद घेत असत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा