माजी आरोग्यमंत्र्यांच्या गाडीला डंपरची धडक, मानेला व पाठीला गंभीर दुखापत

मुंबई, २० जानेवारी २०२३: महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात सावंत यांच्या मानेला, पाठीला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना मुंबईतील अंधेरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डॉ. दीपक सावंत हे शुक्रवारी (२० जानेवारी) सकाळी काशिमीराहून पालघरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. डॉ.सावंत यांच्या गाडीला मागून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. डंपरच्या या धडकेमुळे कारचा मागचा भाग चक्काचूर झाला. डॉ.सावंत यांना मुंबईतील अंधेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र मागून धडक बसली आहे. त्यामुळेच हे षड्यंत्राने तर नसेल ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, डंपर चालक इर्शाद खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राजकारण्यांच्या अपघातांच्या बातम्यांना अचानक उधाण आले आहे. नुकताच माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला होता. गुरुवारी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तसेच आमदार जयकुमार गोरे, योगेश कदम, बाळासाहेब थोरात यांच्या वाहनांना देखील अपघात झाला होता.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा