माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा कारागृहातील मुक्काम पुन्हा वाढला

मुंबई, २१ डिसेंबर २०२२:माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनावरील स्थगिती हायकोर्टाने वाढवली आहे. सीबीआयची विनंती हायकोर्टाने मान्य केली आहे. आज झालेल्या सुनावणीत २७ डिसेंबरपर्यंत स्थगिती वाढवण्यात आली आहे.
त्यामुळे जामीन मंजूर होऊनही अनिल देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

अनिल देशमुख यांच्या जामिनावर दिलेली स्थगिती कायम ठेवावी यासाठी सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची १२ डिसेंबर रोजी जामिनावर सुटका केली.

दरम्यान, १ नोव्हेंबर २०२१ ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. ईडीने देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. ईडीने अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून दोन गुन्ह्यांप्रकरणी अटकेत होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा