कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला BRS पक्षात प्रवेश

छत्रपती संभाजीनगर: नांदेडमधील ज्येष्ठ शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे यांच्या BRS पक्षाचे प्रवेशाच्या चर्चा असतानाच, छत्रपती संभाजीनगर मधील कन्नडचे माजी आमदारांनी पक्षप्रवेश केल्याने राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे.

सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत राहणारे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी (BRS) भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केलाय. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना आव्हान निर्माण केलं होते. या पक्षप्रवेशामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात राजकीय वातावरण चर्चा रंगत आहे. या मुळे भाजपला मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडले आहे. हर्षवर्धन जाधव यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ द्वारे त्यांनी शेतकऱ्यांना एकरी पाच हजार रुपये,चोवीस तास लाईट ती पण मोफत देणार आहे, त्यामुळे नागरिकांना BRS पक्षात प्रवेश करण्याचं आव्हानही त्यांनी यावेळी केलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विनोद धनले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा