गोल पोस्ट महाराष्ट्र खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल, शरद पवार गटाला...

खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल, शरद पवार गटाला धक्का

खालापूर, रायगड १७ डिसेंबर २०२३ : कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

कर्जत खालापूर मतदार संघाचे तीन वेळा लाड यांनी प्रतिनिधित्व केले असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ते अत्यंत जवळचे आणि विश्वासू अशी त्यांचीओळख होती, त्यांच्या भाजप प्रवाशाने रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला शरद पवार गटाला जोरदार धक्का बसला आहे, लाड यांना मानणारा तरुण वर्ग आणि कार्यकर्ते प्रत्येक गावागावात असून त्यांचा फायदा येणाऱ्या काळात भाजपला या मतदार संघात होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : दत्तात्रय शेडगे

error: Content is protected !!
Exit mobile version