गोल पोस्ट महाराष्ट्र जळगाव चोपडा तालुक्यातील मोरचीडा येथील वीर जवान नायब सुभेदार विकास भादले यांच्यावर...

जळगाव चोपडा तालुक्यातील मोरचीडा येथील वीर जवान नायब सुभेदार विकास भादले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

चोपडा, जळगाव १७ डिसेंबर २०२३ : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगात वसलेले मोरचीडा येथील रहिवासी असलेल्या भारतीय सैन्य दलातील नायब सुभेदार विकास भादले यांचे नुकतेच हृद्यविकाराच्या झटक्याने जयपूर येथे निधन झाले. प्रकृती अस्वस्थ्य असल्याने त्यांच्यावर मेडिकल हॉस्पिटल जयपूर येथे उपचार सुरू होते.

नायब सुभेदार विकास भादले यांच्या निधनाचे वृत्त कळताच मोरचिडा गावासह परिसरात शोककळा पसरली. विकास भादले मागील २३ वर्षांपासून सैन्य दलातील ए एम सी तुकडीत कर्तव्य बजावत होते. सद्यस्थितीत ते राज्यस्थान मधील जयपूर येथे देशसेवेसाठी रुजू होते. जवान विकास भादले यांच्यावर मोरचिडा गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येने जनसमुदाय जवान विकास भादले यांना निरोप देण्यासाठी उपस्थित होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आत्माराम पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version