गोल पोस्ट महाराष्ट्र सोलापूरचे माजी आमदार युनुसभाई शेख यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

सोलापूरचे माजी आमदार युनुसभाई शेख यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

सोलापूर, दि.१४ जून २०२०: सोलापूरचे माजी आमदार युनुसभाई शेख यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी सकाळी ११.३० वाजता निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. शनिवारी त्यांना सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

१९६९, १९७५ आणि १९८५ साली तीन वेळा ते सोलापूर महापालिकेचे नगरसेवक होते. १९७५ मध्ये शरद पवार सोलापूरचे पालकमंत्री असताना युनूस भाई शेख यांना त्यांनी निवडून आणून महापौर केले. स्थायी समितीचे सभापती म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. १९९० झाली ते विधान परिषदेवर निवडून गेले. यांच्या जाण्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version