माजी आमदार राजू तोडसाम यांना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

यवतमाळ, १३ डिसेंबर २०२२ : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या भावावरून २०१३ मध्ये हिंसक आंदोलन केल्याप्रकरणी न्यायखलयात सुनावणी पार पडली. माजी आमदार राजू तोडसाम यांच्यासह सहा जणांना केळापूर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रदीप नाईकवाड यांनी तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

या प्रकरणाची माहिती अशी, की २०१३ मध्ये कापसाचा लिलाव सुरू होता. यावेळी आमदार राजू तोडसाम यांच्यासह काही कार्यकर्ते तेथे आले होते. त्यांनी व्यापारी भाव बरोबर देत नसल्याचा; तसेच काट्यात हेराफेरी होत असल्याचा आरोप करीत कापसाचा लिलाव बंद पाडला. त्यानंतर ते लाठ्याकाठ्या घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात शिरले व तोडफोड केली.

यानंंतर इमारतीला आग लावण्यात आली होती. यात ३ लाख ६१ हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेले होते. या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली होती. पांढरकवडा पोलिस ठाण्यात तत्कालीन सहायक निरीक्षक राखी गेडाम यांनी संपूर्ण चौकशी करून आरोंपीवर गुन्हा दाखल दाखल केला होता. हे प्रकरण पांढरकवडा येथील जिल्हा सत्र न्यायालयासमोर चालले.

परिस्थितीजन्य पुरावा व साक्षीदांराच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायाधीश पी. बी. नाईकवाड यांनी माजी आमदार राजू तोडसाम यांच्यासह सहा जणांना तीन वर्षे सक्तमजुरी व १२ हजार रुपये दडांची शिक्षा सुनावली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा