माजी खासदार राजू शेट्टी यांना कोरोनाची लागण

मुंबई, १० सप्टेंबर २०२०ः कोरोनाने देशात थैमान मांडला आहे. देशात रोज कोरोना रुग्णांचे  नव-नवीन विक्रम मोडले जात आहेत. अनेक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, यात कितीतरी लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव हा प्रसिद्ध अभिनेते आणि नेते मंडळी यांच्यावर ही दिसून आला आहे. अशातच आज माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना कोरोनाची लागण झाली आहे. राजू शेट्टी यांनी कोरोना चाचणी करून घेतली असता त्याचा अहवाल पॉझिटिव आला आहे. त्यानंतर त्यांची प्रकृतीही बिघडू लागली. यासाठी त्यांना पुण्यातील दिनानाथ मंगशेकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. आधी राजू शेट्टी यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. चांगल्या वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली राजू शेट्टी यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

राजू शेट्टी यांची पत्नी तसंच मुलगा सौरभ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा अहवाल देखील पॉझिटिव आला आहे. राजू शेट्टी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा