माजी प्रधानमंत्री दिवगंत इंदीरा गांधी यांच्या जंयती निमित्त प्रधानमंत्र्यांसह देशभरातून आंदराजली

नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर २०२० : देशाच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या १०३ व्या जतंतीनिमित्त आज देशभरात त्यांचं स्मरण करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांनी शक्तीस्थळ या त्यांच्या समाधी ठिकाणी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली.इंदिरा गांधी यांच्या १०३ व्या जयंती निमित्ताने राजभवन येथे त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली तसंच सामुहिक राष्ट्रीय एकात्मता शपथ घेण्यात आली. दरवर्षी १९ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

राजभवनात राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली यावेळी राजभवनातील कर्मचारी आणि अधिकारी यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.सोलापूर इथं इंद्र भवन आवारातील इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला आणि महापौर कार्यालयातील प्रतिमेला सहाय्यक आयुक्त सुनील माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. या वेळी नगरसचिव प्रवीण दंतकाळे,जयप्रकाश अमनगी,उत्तम मोरे, शशिकांत जिड्डेलु.अशोक खडके,सिद्धू तिमिगार,आकाश शिवशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते

नाशिक मध्ये जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यात आलं.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ सुधीर तांबे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, प्रदेश प्रवक्ता डॉ. हेमलता पाटील, माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सिंधुदुर्ग मध्ये ही इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा