माजी रणजीपटू शेखर गवळी यांचा ट्रेकिंग दरम्यान दरीत पडून मृत्यू

5

नाशिक :२ सप्टेंबर,२०२०: माजी रणजीपटू शेखर गवळी यांचा ट्रेकिंग दरम्यान दरीत पडून मृत्यू झाला आहे. तसेच रात्रभर शोध घेतल्या नंतर ही मृतदेह न सापडल्याने सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केली असता त्यांचा मृतदेह अखेर सकाळी ९ वाजता सापडला आहे.

नाशिकच्या इगतपुरी परिसरात शेखर गवळी हे काही सहकाऱ्यांसोबत ट्रेकिंगसाठी गेले होते. त्यावेळी पाय घसरुन ते अचानक पडले आणि थेट दरीत कोसळले.

काल मंगळवारी दिनांक १ सप्टेंबर रोजी त्यांचा पाय घसरुन ते दरीत पडले ,काल संध्याकाळ पासून मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. तसेच मृतदेह हाती लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेने क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. शेखर गवळी हे महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा