गोल पोस्ट इतर राजकारण कदमवाक वस्ती गावच्या माजी सरपंच बेबीताई काळभोर यांचे दुःखद निधन

कदमवाक वस्ती गावच्या माजी सरपंच बेबीताई काळभोर यांचे दुःखद निधन

लोणी काळभोर, ६ ऑगस्ट २०२०: पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष नंदू काळभोर यांच्या मातोश्री व कदम वस्ती गावच्या माजी सरपंच बेबीताई काळभोर यांचे आज दिर्घ आजाराने निधन झाले आहे. बेबीताई यांच्यावर नोबेल हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी ४ वाजता उपाचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. नंदू काळभोर यांच्या मातोश्रीच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांचे सांत्वन केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली जाहीर केली आहे, त्याचे पालन करूनच अंत्यसंस्कार केले जातील, असे नंदू काळभोर यांनी सांगितले आहे. नंदू काळभोर यांच्या मातोश्री ६२ वर्षाच्या होत्या. तसेच त्या कदम वाकवस्ती गावच्या माजी सरपंच होत्या, त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version