गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा लोणी काळभोर गावचे माजी सरपंच बाजीराव काळभोर यांचे दुःखद निधन

लोणी काळभोर गावचे माजी सरपंच बाजीराव काळभोर यांचे दुःखद निधन

लोणी काळभोर, दि. ६ ऑगस्ट २०२०: रोजी लोणी काळभोर गावचे माजी सरपंच बाजीराव सर्जेराव काळभोर यांचे आज दिर्घ आजाराने निधन झाले आहे. बाजीराव यांच्यावर जहांगीर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, आज गुरुवारी ५ च्या दरम्यान उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांचे सांत्वन केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली जाहीर केली आहे, त्याचे पालन करूनच अंत्यसंस्कार केले जातील, असे काळभोर यांनी सांगितले आहे. बाजीराव काळभोर यांचे वय अंदाजे ७१ होते. तसेच लोणी काळभोर गावचे ते माजी सरपंच होते, त्यांच्या पश्चात बायको, दोन मुले, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे.

error: Content is protected !!
Exit mobile version