शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचे निधन

अहमदनगर, ५ ऑगस्ट २०२०: माजी मंत्री शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचे आज पहाटे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अनिल राठोड यांना आठ दिवसापूर्वी एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.

आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. अनिल राठोड यांच्या मागे पत्नी, एक मुलगी आणि मुलगा विक्रम राठोड असा परिवार आहे.

अनिल राठोड हे नगर विधानसभा मतदार संघातून गेले २५ वर्षे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या निधनाने नगर सह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. राठोड यांच्यावर आज सकाळी दहा वाजता नगराच्या अमरधाम मध्ये त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा