श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्र सेनानायकेला मॅच फिक्सिंगप्रकरणी अटक

कोलंबो, ६ सप्टेंबर २०२३ : श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्रा सेनानायकेला मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली आज (बुधवारी) अटक करण्यात आली. सेनानायकेने आज सकाळी आत्मसमर्पण केले, त्यानंतर त्याला क्रीडा विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तीन आठवड्यांपूर्वी न्यायालयाने त्याला परदेशात जाण्यास बंदी घातली होती.

सेनानायकेवर लंका प्रीमियर लीग २०२० मधील सामने फिक्स केल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये त्याने दोन खेळाडूंना सामना फिक्स करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. ३८ वर्षीय सेनानायकेने २०१२ ते २०१६ दरम्यान एक कसोटी, ४९ एकदिवसीय आणि २४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले.

त्याने आयपीएल २०२३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स साठी आठ सामने खेळले. न्यायालयाला आज सांगण्यात आले की क्रीडा मंत्रालयाच्या विशेष तपास युनिटने अॅटर्नी जनरल विभागाला, या माजी ऑफस्पिनरविरुद्ध फौजदारी आरोप निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा