ठाकरे गटाचे माजी आमदार अवधूत तटकरे यांचा भाजप प्रवेश

मुंबई,१४ ऑक्टोंबर २०२२ : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ता संघर्ष होऊन शिंदे यांनी शिवसेनेचे असंख्य आमदार फोडत शिवसेनेसोबत बंड करून मुख्यमंत्री झाले आणि ठाकरे आणि महाविकास आघाडीला पहिला दणका दिला, त्यानंतर शिवसेना आमचीच असा दावा करत त्यांनी हे धकातंत्र सुरूच ठेवले.

शिंदे यांच्या बंडानंतर अनेक नेते, आमदार, खासदार, शिवसेनेचे पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पण, यावेळी शिंदे यांनी नाही तर भाजपाने धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार अवधूत तटकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये अवधूत तटकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लागलेली गळती रोखण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मात्र, शिंदे गट आणि भाजपात प्रवेश सुरूच आहे.

अवधुत तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत. माजी आमदार अनिल तटकरे यांचे जेष्ठ चिंरजीव आहेत. यापुर्वी त्यांनी रोहा शहराचे नगराध्यक्षपद भुषवले आहे. नंतर विधान सभेत श्रीवर्धन मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे. गृहकलहामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता.

पण पक्षसंघटनेत त्यांना फारसे स्थान देण्यात आले नव्हते. आता शिवसेनेतील फूट आणि त्यामुळे पक्षाची झालेली वाताहत लक्षात घेऊन त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान अवधुत तटकरे यांनी आपल्या समर्थकांसोबत आज चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा