चेन्नई, २३ डिसेंबर २०२२: माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मोठी कारवाई केली आहे. ए. राजा यांची तब्बल ५५ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडू कोईम्बतूर येथील त्यांची ४५ एकर जमीन ईडीने तात्पुरती जप्त केली आहे. याप्रकरणी स्थानिक न्यायालयाने ए राजा यांना १० जानेवारी २०२३ रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. २०१५ मध्ये ए राजा यांच्यावर बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ए राजा हे २००४ ते २००७ या कालावधीत पर्यावरण आणि वन मंत्रालयात कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या अर्थात डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये राजा हे केंद्रीय मंत्री होती. त्यावेळी त्यांच्या खात्याशी संबंधित २ जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रचंड गाजला होता व त्यात राजा यांना तुरूंगवारीही करावी लागली होती.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.