नवी दिल्ली : २७ सप्टेंबर ,२०२० पूर्व केंद्रीय मंत्री जसवंत सिंग यांचे ८२ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी त्याच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. २०१४ मध्ये ते घरात पडले होते. आणि तेव्हापासून त्यांची प्रकृती ही अस्थिर होती. त्यांच्यावर सेना च्या रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात उपचार सुरू होता. त्यानंतर खूप वेळा त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर राजस्थान स्तिथ जोधपूर मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले .
रुग्णालय प्रशासनाने सांगितले की ,अत्यंत वाईट बातमी आहे. माननीय सेवानिवृत्त मेजर आणि पूर्व केंद्रीय मंत्री जसवंत सिंग यांचे २७ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी दुःखद निधन झाले आहे. त्यांना २५ जून २०२० रोजी रुग्णालयात दाखील करण्यात आले होते. त्यांच्या शरीरातील अवयवांनी काम करणे बंद करून दिले होते. तसेच आज सकाळी त्यांना हृदयिकाराचा झटका आला. आणि खूप प्रयत्न करून सुद्धा आम्हाला त्यांना वाचवण्यात यश नाही आले.
जसवंत सिंग यांच्या निधनानंतर प्रधानमंत्री मोदी यांनी लिहिले की ” जसवंत सिंग यांनी पूर्ण मन लाऊन आपल्या देशाची सेवा केली. आधी एक सैनिकाच्या स्वरूपात आणि त्यानंतर राजकारणामध्ये ही उत्तम कामगिरी केली. अटल जींच्या सरकार मध्ये त्यांनी महत्वपूर्ण मुद्द्यांमध्ये एक महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या निधनाने खूप दुखी आहे.पुढे ते म्हणाले, पूर्व केंद्रीय मंत्री , राजकारण आणि समाज या मुद्द्यांवर आपल्या अद्वितीय दृष्टीकोनामुळे सर्वांना लक्षात राहतील. त्यांनी भाजपा ला मजबूत बनवण्यात मोलाचे योगदान दिले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे