अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केली उमेदवारी

युएस, १६ नोव्हेंबर २०२२ : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा २०२४ च्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. ७६ वर्षीय ट्रम्प यांनी बुधवारी ट्विट करत ही माहिती दिली. २०२४ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ते रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असतील. “अमेरिकेला पुन्हा महान आणि गौरवशाली बनवण्यासाठी”, मी आज रात्री अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी माझी उमेदवारी जाहीर करत आहे.

एएनआय वृत्तसंस्थेनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी १६ नोव्हेंबर रोजी २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी औपचारिकपणे कागदपत्रे दाखल केली. यावेळी ट्रम्प यांनी फ्लोरिडातील एका रिसॉर्टमध्ये आपल्या समर्थकांना शुभेच्छा दिल्या. आता अमेरिकेचे पुनरागमन सुरू होत असल्याचे त्यांनी आपल्या समर्थकांना सांगितले.

मध्यावधी निवडणुकीतील निराशाजनक पराभवानंतर ट्रम्प आता व्हाईट हाऊससाठी तिसरी मोहीम सुरू करण्याच्या तयारीत आहेत. मध्यावधी निवडणुकांच्या निकालांचा उपयोग ते आपल्या पक्षाचे उमेदवारी मिळवण्यासाठी करू शकतील, अशी आशा ट्रम्प यांना असली तरी आता त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसचे उमेदवारी अर्ज यूएस निवडणूक प्राधिकरणाकडे दाखल केले आहेत. २०२४ मध्ये पक्षाच्या नामांकनासाठी संभाव्य उमेदवार फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसँटिस आणि माजी उपाध्यक्ष माइक पेन्स आहेत. ४३५ जागांच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये ट्रम्प यांना बहुमत मिळवावे लागेल. डेमोक्रॅटिक यूएस सिनेटर राफेल वॉर्नॉक विरुद्धच्या शर्यतीत ट्रम्प यांच्या निवडलेल्या उमेदवारांमध्ये माजी फुटबॉल स्टार हर्शेल वॉकर देखील आहेत.

मध्यावधी निवडणुकीतील निराशाजनक निकालानंतर ट्रम्प यांच्यावर अनेक आरोप होत आहेत की, त्यांच्या पाठिंब्यामुळेच रिपब्लिकन उमेदवार निवडणुकीत पराभूत झाले. दरम्यान, ट्रम्प यांनी १५ नोव्हेंबरला आपल्या सोशल मीडियावर जाहीर केले की, १६ नोव्हेंबर हा आपल्या देशाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस असेल! ट्रम्प यांच्यासाठी ही निवडणूक खूपच कठीण ठरू शकते कारण त्यांच्यावर राष्ट्राध्यक्ष म्हणून दोनदा महाभियोग चालवण्यात आला आहे. अमेरिकेच्या इतिहासात ग्रोव्हर क्लीव्हलँड हे एकमेव राष्ट्रपती होते ज्यांनी राष्ट्रपतीपद सोडल्यानंतर १८८४ आणि १८९२ मध्ये पुन्हा राष्ट्राध्यक्षपद स्वीकारले.

ट्रम्प २०२४ ची निवडणूक जिंकू शकतील का?

ट्रम्प २०२४ ची अध्यक्षीय निवडणूक लढवणार की नाही यावर बराच काळ चर्चा सुरू होती. याआधी २०१५ मध्ये ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. २०२० च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता पण आता त्यांना २०२४ मध्ये पाठिंबा मिळवता येईल का हा प्रश्न आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड,

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा