सिमेंट चोरी प्रकरणातील चार आरोपी जेरबंद

14

इंदापूर, ३ ऑक्टोबर २०२० : भिगवणमधील पेट्रोल पंपावर उभ्या असणाऱ्या टेंपोमधून शंभर पोती चोरणाऱ्या चोरट्यांना भिगवण पोलिसांना जेरबंद करण्यात यश मिळाले असून यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राशीन रस्त्यावरील शुभम पेट्रोल पंपाजवळ उभा असणाऱ्या टेम्पो मधून शंभर सिमेंटची पोती १९ सप्टेंबर रोजी चोरीला गेले होते या प्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणी पोलीस अधीक्षक डाॅ.अभिनव देशमुख यांनी गुन्ह्यातील आरोपीचा तपास करण्यासाठी पोलीसांना सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे भिगवण पोलीसांनी चार आरोपींना अटक करुन, त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी संतोष राजेंद्र गुणवरे (वय २५ वर्ष ), परशुराम नामदेव डोणगे (वय २५ वर्ष), आकाश विठ्ठल आडागळे (वय २७ वर्ष), विजय दिलीप शिंदे (वय ३० वर्ष) सर्व रा. भिगवण स्टेशन ता. इंदापूर, जि. पुणे. या आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपाजवळ दि.२७ व २८ आॅगस्ट दरम्यान एका टेम्पो मधून १०० गोणी सिमेंट चोरीला गेले होते. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस नाईक सुधाकर जाधव यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या प्रकरणातील चारही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सिमेंट चोरीचे आणखी रॅकेट उडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रतिनिधी निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा