गोल पोस्ट महाराष्ट्र दारू बंदी पथकावर हल्ला केल्याप्रकरणी छत्रपती संभाजी नगरमधुन चार जण हद्दपार

दारू बंदी पथकावर हल्ला केल्याप्रकरणी छत्रपती संभाजी नगरमधुन चार जण हद्दपार

छत्रपती संभाजीनगर १४ जानेवारी २०२४ : संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथील हॉटेलवर अवैध दारू विक्री होत असताना दारू बंदी विशेष पथकाने कारवाई केली होती. कारवाई दरम्यान विशेष पथकावर चार आरोपींनी हल्ला करून पथकाच्या वाहनाला पेटवून दिले होते.

या प्रकरणी बद्रीनाथ महारु राठोड, किरण बद्री राठोड, राहुल भाईदास राठोड, संदीप बद्री राठोड सर्व राहणार नांदगाव तांडा अशी जिल्ह्यातुन एक वर्षाकरिता हद्दपार केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पुढील तपास सोयगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अनमोल केदार हे करीत आहेत

न्यूज अनकट प्रतिनिधी : गजानन राऊत

error: Content is protected !!
Exit mobile version