गोल पोस्ट महाराष्ट्र उदगीर तालुक्यातल्या कुमठा खूर्द येथे अल्पवयीन मुलाचा खून

उदगीर तालुक्यातल्या कुमठा खूर्द येथे अल्पवयीन मुलाचा खून

उदगीर, लातूर १४ जानेवारी २०२४ : लातूरच्या उदगीर तालुक्यातील कुमठा येथे एका १४ वर्षीय मुलाचा खून झाल्याची घटना १३ जानेवारीला उघडकीस आली आहे. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष गोविंद घुगे या १४ वर्षीय मुलांचा कोणीतरी खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

संतोष गोविंद घुगे हा मुलगा १० जानेवारी रोजी घरातून बेपत्ता झाला होता. १३ जानेवारी रोजी कुमठा शेत शिवारात सदरील मुलाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळून आला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संतोष गोविंद घुगे यास अज्ञात कारणासाठी अज्ञात हत्याराने मारून त्याचा खून करून त्याची ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा कशाने तरी विद्रुप केला होता.

खुनाची फिर्याद गोविंद तुकाराम घुगे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून अज्ञात आरोपींवर गुरंन २८/२०२४ कलम ३०२,२०१ भादवी प्रमाणे १३ जानेवारी रोजी शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार हे करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सुधाकर नाईक

error: Content is protected !!
Exit mobile version