८ फेब्रुवारी २०२५ हिंगोली : महाराष्ट्र सरकारची चेंजमेकर ठरलेली माझी लाडकी बहीण योजनेत अनोखा प्रकार उघडकीस आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील चार लाडक्या भावांनी आपल्या आधारकार्डवर महिलांचा फोटो लाऊन लाडक्या बहिण योजनेचा लाभ घेतला. आतापर्यंत या चार भावांनी सहा हप्ते घेतले आहेत. महिला व बाल कल्याण विकास मंत्रालयांतर्गत अनेक महिलांना लाडक्या बहीण योजनेतून आपत्र केल जात आहे. याच कारवाईच्या भीतीने त्यांनी दिलेल्या अर्जावरून हिंगोली जिल्ह्यात हा प्रकार उघडकीस आला. या चारही जणांवर शासन निर्देशानुसार कारवाई होणार असल्याचे महिला व बालविकास विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यात तब्बल साडेतीन लाख महिलांनी लाडक्या बहिणीसाठी अर्ज केले होते. या सर्व महिलांच्या खात्यात आतापर्यंतच्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. यानंतर सरकारने बोगस लाभयार्थ्यांनी योजनेचा लाभ घेणे बंद करावा असे अर्ज देऊन अवाहन केले होते. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात आठ जणांनी लाभ बंद करण्याचा अर्ज दिला. यामध्ये ४ पुरुषांचा समावेश होता.
या संदर्भात महिला व बालकल्याण विकास अधिकारी राजेश मगर यांनी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर