नाशिक, १ ऑगस्ट २०२३: आगामी सिंहस्थ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर, महत्वाकांक्षी ‘नमामि गोदा’ प्रकल्पाला गती देण्यासाठी नगररचना विभागाने पुढील चार दिवसांत गोदावरी पात्र व आजूबाजूच्या परिसराचा ड्रोन सर्वेक्षण अहवाल पुढील चार दिवसांत सादर करावा. असा अल्टिमेटम नूतन मनपा आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांनी दिला. या कामात कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, अशा शब्दांत नगररचना विभागाची त्यांनी कानउघाडणी केल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या आठवड्यात मनपा आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्त डॉ.करंजकर यांच्याकडून चालू आठवड्यात महापालिकेच्या सर्व विभागांचा तपशीलावर आढावा घेतला जाणार आहे. सोमवारी त्यांनी गोदावरी संवर्धन कक्ष व पर्यावरण विभागाचा आढावा घेतला. त्यात ‘नमामि गोदा’ प्रकल्प मुद्द्याला त्यांनी प्राधान्य देत तो कूठपर्यत प्रगतिपथावर आहे, याची माहिती घेतली.
गोदावरीसह तिच्या उपनद्यांवर छोटेमोठे एकूण ५० पेक्षा जास्त पुल आहेत. नागरिकांकडून पुलावरून नदीत निर्माल्य व कचरा टाकून प्रदूषण केले जाते. ते पाहता १३ पुलांवर दोन्ही बाजूंनी जाळ्या लावाव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर