उत्तरकाशी-गंगोत्री महामार्गावर वाहनांवर दरड कोसळली, चार भाविक ठार

उत्तरकाशी, ११ जुलै २०२३ : उत्तरकाशी गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावरील गरम कुंड गंगनानीजवळ दरड कोसळली. या दुर्घटनेटत एक टेम्पो ट्रॅव्हल्स आणि दोन छोटी वाहने ढिगाऱ्याखाली गाडली गेली. यात ४ भाविकांचा मृत्यू झाला असुन ६ हून अधिक जण जखमी झाले आहेत. आतापर्यंत एकच मृतदेह बाहेर काढण्यात आलाय, तर इतरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एसडीआरएफने बचाव कार्य सुरू केले आहे.

गंगोत्रीहून उत्तरकाशीला यात्रेकरू परतत असताना ही घटना सोमवारी रात्री घडली. स्थानिक लोकांच्या मदतीने रात्री उशिरा काही प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्व प्रवासी हे मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी आहेत.

रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. मात्र रात्री उशिरापर्यंत मोठमोठी दरड पडत असल्याने बचावकार्य थांबवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरकाशीमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी वाहने अडकून पडली आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा