सावकारी प्रकरणी प्रताप जधाववर चौथा गुन्हा दाखल

बारामती, दि. ३ जुलै २०२०: बारामती जमीन खरेदी करण्यासाठी व्याजाने घेतलेल्या चार लाख रुपयांच्या बदल्यात ५ लाख ६० हजार रुपये देऊनही पैसे घेतलेल्या व्यक्तीची कुलमुखत्यार पत्र करून घेतलेली. १९ गुंठे जमीन परस्पर विक्री केल्याप्रकरणी प्रताप रमेश जाधव (रा. शिवनगर, बारामती) व अन्य तिघांच्या विरोधात बारामती पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी कायद्यानुसार बेकायदा सावकारी प्रकरणी चौथा गुन्हा दाखल झाला आहे.

इतर तीन गुन्ह्यात तो तीन महिन्यांपासून कारागृहात आहे. जमीन हस्तांतर प्रकरणी संतोष भाऊसो भोसले यांनी फिर्याद दिली असुन प्रताप जाधव व त्याच्या तीन साथीदारांच्या विरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सन २०१२ साली जळोची येथील काळूराम जमदाडे यांची कटफळ येथील अडीच एकर जमीन खरेदी करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने भोसले यांनी प्रताप जाधव याच्या कडून त्यांचा मित्र संदीप जाधव याच्या मध्यस्थीने दर महिन्याला दहा टक्के व्याजाने पैसे घेतले. मात्र या बदल्यात तुझ्या कोणत्याही स्थावर मालमत्तेचे कुलमुखत्यार करून देण्याची अट घातली त्याप्रमाणे भोसले यांनी सावळ येथील गट क्रमांक २५४ मधील १९ गुंठे जमीनीचे दुय्यम निबंधक कार्यालयात रीतसर कुल मुखत्यारपत्र करून दिले असल्याची माहिती मिळाली.

त्यामुळे २०१२ मध्ये  फिर्यादी व त्यांचा मित्र संदीप शरद भोई या दोघांनी प्रताप जाधव याची भेट घेतली. मी पैसे देतो परंतू त्यापोटी दरमहा मला १० टक्के व्याज द्यावे लागेल, पैशाच्या संरक्षणासाठी कोणत्याही स्थावर मालमत्तेचे कुलमुखत्यार करून द्यावे लागेल, असे जाधव याने सांगितले. त्यानुसार फिर्यादीने त्यांचे सावळ येथील जमीन गट क्रमांक २५४ मधील १९ गुंठे क्षेत्राचे कुलमुखत्यार दुय्यम निबंधक कार्यालयात करून दिले.

४ लाख रुपये व्याजाने घेतलेल्या रकमेपोटी फिर्यादीने ५ लाख ६० हजार रुपये परत केले तरी देखील प्रताप जाधव व त्याच्या तीन साथीदारांनी त्यांच्या घरी जाऊन मुले व पत्नीसमोर धमकी दिली. तुझ्यावर खोटा दावा करू अशी दमबाजी करत जमिनीचा नाद सोडण्यास सांगितले मात्र ही जमीन जाधव याने विकली आहे असे समाजातच फिर्यादी संतोष भोसले यांनी बारामती शहर पोलिसांकडे तक्रार केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा