अलिबाग १७ डिसेंबर २०२३ : अलिबाग तालुक्यामध्ये वरसोली येथील विठ्ठल मंदिर परिसरात सलग पाच दिवस मोठी यात्रा भरते. या यात्रेमध्ये अलिबाग तालुक्यामधून हजारो भाविक यात्रेकरू येत असतात. या ठिकाणी भरपूर मोठमोठी खेळण्याची दुकाने, विविध मिठाईची दुकाने तसेच पाळणे आणि असतात. यात्रेत मोठी गर्दी असते. जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग, वरसोली ग्रामपंचायत, विठ्ठल मंदिर देवस्थान व माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने या यात्रेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सामान्य रुग्णालय व माणुसकी प्रतिष्ठान यांच्या वैद्यकीय पथकाने सर्वांच्या आरोग्याची तपासणी केली. आयुष्यमान भारत अंतर्गत १८ वर्षावरील सर्व पुरुषांच्या आरोग्य तपासणी करून नोंदी केल्या, या शिबिरात ८०० हून अधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला. आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालय अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. शितल जोशी आणि विठ्ठल मंदिर देवस्थानचे अध्यक्ष श्री रमेश नाईक, सुरेंद्र जोशी, उपसरपंच प्रणिता म्हात्रे तसेच माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रमोद जाधव