बारामती नगर परिषद कर्मचाऱ्यांची मोफत कोविड-१९ पूर्व तपासणी.

4

बारामती, २५ जुलै २०२०: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंडियन मेडिकल गिल्ड व मेडिकल असोसिएशन ने कोरोना संसर्गाच्या कठीण परिस्थितीत रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या बारामती नगर पालिकेच्या
अधिकारी,स्टाफ तसेच चतुर्थ श्रेणी सफाई कर्मचाऱ्याची कोविड तपासणी केली.

बारामती नागर परिषदेच्या अधिकारी ,कर्मचारी यांची इंडियन मेडिकल गिल्ड व मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व विद्या प्रतिष्ठान व ऍक्सेस बँक यांच्या मदतीने बारामती पालिकेच्या ५०० कर्मचाऱ्यांची कोविड पूर्व तपासणी करण्यात आली.

 

आज आणि उद्या दोन दिवस तपासणी शिबिर राबवणार असल्याचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले. यावेळी सरकारी हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.सर्व कर्मचाऱ्यांचे रक्ताचे नमुने, छातीचा एक्सरे,तसेच सर्दी, ताप, खोकला याची तपासणी करण्यात आली आहे.

सध्या कोरोना संसर्गाच्या काळात कोरोना रुग्ण आढळलेल्या परिसरात व सार्वजनिक ठिकाणी जास्त वेळ काम करावे लागत आहे.त्यामुळे आमच्या स्वास्थ्याकडे लक्ष नाही. आज आमची कोविड पूर्व तपासणी येथे येऊन केल्याचे समाधान असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा