गरजू नागरिकांची होणार मोफत रॅपिड अँटिजेन टेस्ट – नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर

उस्मानाबाद, १४ ऑगस्ट २०२०: कोरानाच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढतच जात आहे. वेळेवर उपचार घेतल्यास रूग्ण लवकर बरे देखील होत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये नागरिक शासकिय रूग्णालयात जाणे टाळत आहेत, आणि खाजगी रूग्णालयातील होणारा खर्च त्यांना परवडणारा नाही. या कारणामुळे, उस्मानाबाद शहरातील गरजू नागरिकांची मोफत रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी सांगितले आहे.

उस्मानाबाद शहरातील कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिनांक १९ ऑगस्ट २०२० पासून छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह नगरपरिषद, उस्मानाबाद येथे शहरातील सर्व गरजू  नागरिकांसाठी मोफत रॅपिड अँटिजेन टेस्ट अभियान राबविण्यात येणार आहे. जोपर्यंत कोरोनाचा संसर्ग थांबत नाही तो पर्यंत हे अभियान सुरू राहणार असल्याचे नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी सांगितले.

सोबतच, त्यांनी नागरिकांना विनंती देखील केली की कुठलाही आजार अंगावर काढू नये, तर वेळेवर उपचार घेण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह नगरपरिषद, उस्मानाबाद येथे येऊन राबविण्यात येत असलेल्या मोफत रॅपिड अँटिजेन टेस्ट या अभियानाचा लाभ घ्यावा. तसेच, आपले शहर हे लवकर कोरोना मुक्त करण्यासाठी नगरपरिषद उस्मानाबाद आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा