नेहरू युवा केंद्र पुणे व हरित मित्रपरिवार यांच्या मार्फत बीज वाटप व मार्गदर्शन कार्यक्रम

पुरंंदर, २२ ऑक्टोंबर २०२०: नेहरू युवा केंद्र संघटन व हरित मित्र परिवार डॉक्टर महेंद्र घागरे यांनी काल पुरंदर तालुक्यातील सासवड येथे तहसीलदार कचेरी, सासवड पोलिस स्टेशन, पंचायत समिती पुरंदर येथील अधिकारी व इतर लोकांना मिळुन एकुण २३८ लोकांना २ हजार बीजांचे वाटप केले.

यावेळी रक्त चंदन व खैर या सारख्या देशी झाडांचे बीज मोफत वाटण्यात आले .या वृक्षांच्या संवर्धनासाठी मार्गदर्शन करण्यात आले. या मध्ये बीज कसे लावायचे, त्याची निगा कशी राखायची, निसर्गाची काळजी आदी विषयांवर डॉ. महेंद्र घागरे यांनी मार्गदर्शन केले. प्रतेक वेळेस शासनावर प्रशासनावर अवलंबुन राहु नये समाजाने समाजाची जबाबदारी उचलावी असा मत बाळासाहेब ढमाले यांनी वक्तव्य केल, तसेच ते पुढे म्हणाले कि आपल्या शेतामध्ये दहा पाच एकरा मध्ये जमिन करायला आपल्याला किती अडचनी येतात तेच शासनाने व प्रशासनाने आपल्या गावातील सेवा करायची आणि वेळेवर काम न झाल्या मुळे ते अपेक्षित यशस्वी होत नाही. आपण मुलांच्या श्रम दानातुन हे काम कराव हे कस व्यवस्थित करता येईल त्याचा विचार करावा या कार्यक्रमास सासवड पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी उत्कृष्ठ प्रतिसाद दिला.

ही मोहिम संपुर्ण पुरंदर तालुक्यातील शाळा, कॉलेज, युवक व युवती मंडळे यांच्या माध्यमातुन मोफत राबवणार आहे. आत्तापर्यंत हरित मिञ परिवाराने ५५ लाख बीज व रोपांची लागवड केली आहे. गेल्या १५ वर्षा पासुन हा राबवत आहे.

काल पुरंदर मध्ये हरीत मिञ परिवार चे संस्थापक डॉ. महेंद्र घागरे, अध्यक्ष बाळासाहेब ढमाले, नेहरु युवा केंद्र संगठन पुणे चे प्रतिनिधि स्वप्नील शिदे यांनी नेहरु युवा केंद्र पुणे जिल्हा युवक कल्याण अधिकारी यशवंत मानखेडकर यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित केला होता. यावेळी जाणिव हँकर्स संघटनेचे निलेश भुजबळ, सुनिल निगडे उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा