मुंबई: महाराष्ट्र राज्यातील पुणे येथे धोबी (परीट) समाजातील तरुणांना आता रोजगार व स्वयंरोजगारासाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सुरवातीला राज्यातील ३० युवकांना तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती परीट संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे संचालक चेतन शिंदे यांनी लढाऊ लेखणीला दिली.
एप्रिल २०२० मध्ये प्रशिक्षण दिले जाणार असून त्यात लॉंड्री व्यवसायिक यांची यशोगाथा/मार्गदर्शन, लॉंड्री व्यवसायिक साठी लागणार्या मशिनरी व त्यांच्या तज्ञा कडून मार्गदर्शन, लॉंड्री व्यवसायिकाला बँकेमार्फत मिळणारी आर्थिक मदत (लोन) याची माहिती दिली जाणार आहे.
या प्रशिक्षणासाठी नावनोंदणी सुरु असून प्रथम येणार्यास प्राधान्य देण्यात येईल. ई-मेलवरुन नाव नोंदणीसाठी cshinde21@gmail.com यावर बायोडाटा पाठवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
PRTI, India अंतर्गत भारतामधील लॉंड्री व्यवसायिक करीत आहेत किंवा हा व्यवसाय करण्याचा ज्यांचा मानस आहे त्यांच्यासाठी पुण्यातील आमच्या प्रशिक्षण संस्थेमध्ये मोफत प्रशिक्षण वर्ग घेत राहू शकतात. त्यासाठी वेळोवेळी संपर्कात राहून प्रशिक्षणाचे वेळापत्रक जाणून घ्यावे असे आवाहन चेतन शिंदे यांनी केले आहे.
प्राथमिक तत्वावर काम सुरु
लॉंड्री व्यवसायिकांसाठी प्राथमिक तत्वावर या स्वरूपाचे काम सुरु केलेले आहे.
भविष्यात लॉंड्री व्यवसायिकांना स्वतंत्र व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रशिक्षण, बँकलोन, दुकान, मशिनरी, ग्राहक इत्यादी विषय एकत्रित करून एक योजना आखण्यात येणार आहे. लॉंड्री व्यवसायिकाला एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळतील व त्याला व्यवसाय करायला व आर्थिक नियोजन करायला सहज सोपे होईल हा उद्देश्य ठेवून प्रशिक्षयणाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अन्य कौशल्य विषयक प्रशिक्षणासह इतर सर्व रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीचे प्रशिक्षण/मेळावे/मार्गदर्शन शिबीराचे आयोजन वेळोवेळी प्रत्येक जिल्ह्यात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असणार असल्याचे आयोजक चेतन शिंदे यांनी सांगितले.