पालिका प्रशासनाकडून कोविड रुग्णांसाठी मोफत इलाज 

पुणे, २३ सप्टेंबर २०२०: बारामती तालुक्यामध्ये कोविड-19 या विषाणूंचा प्रार्दूभाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. कोरोनाची बाधा झालेल्या रूग्णांकडून जादा बील आकारले जात असल्याच्या तक्रारी, औषधांचा भासत असलेला तुटवडा, यावर उपाय म्हणून औषध व गरजेची इंजेक्शन वेळेत व माफक दरात रूग्णांना उपलब्ध करून देण्यासाठी त्यावर तात्काळ नियंत्रण आणण्यासाठी बारामती तालुका मध्यवर्ती सुविधा केंद्र, बारामती नगरपरिषद बारामती येथे सुरू करण्यात आले आहे. या सुविधा केंद्रामध्ये बेड व्यवस्थापन कक्ष, अत्यावस्थ रूग्ण व्यवस्थापन कक्ष, रूग्णवाहिका व्यवस्थापन कक्ष, औषध व ऑक्सिजन व्यवस्थापन कक्ष, बील तपासणी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

कक्षाचे प्रमुख पुढीलप्रमाणे असून गरजुंनी संपर्क साधावाः

बेड व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख गणेश कराड (उपअधिक्षक, भूमीअभिलेख,), मो.नं –9767422975

अत्यावस्थ रूग्ण व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख भानुदास साळवे ,(सहाय्यक गट विकास अधिकरी, पंचायत समिती), मो.नं – 9850930692 या दोन्ही कक्षांचा संपर्क क्रमांक – 7768808715 आहे.

रूग्णवाहिका व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख दत्तात्रय पडवळ , (तालुका कषि अधिकारी), मो.नं – 9767215274

औषध व ऑक्सिजन व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख नांगरे (ड्रग इन्स्पेक्टर ), मो.नं – 7387561343
या दोन्ही कक्षांचा संपर्क क्रमांक – 7768808716 आहे.

बील तपासणी कक्षाचे प्रमुख धनंजय गाडे (लेखा परिक्षक वर्ग-2 सहकारी संस्था), मो.नं- 9175939664, कक्ष संपर्क क्रमांक – 7768808717 आहे.

ज्या कोरोना रूग्णास बेड, रूग्णवाहिका, औषध, ऑक्सिजन व जादा बील आकारल्या बाबतच्या तक्रारी असल्यास वरील कक्ष प्रमुखांशी संपर्क साधावा असे, आवाहन उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा