मुंबई 6 फेब्रुवारी 2022: जिओने काही काळापूर्वी प्रीपेड प्लॅन महाग केले होते. पण, Jio च्या पोस्टपेड प्लस प्लॅनच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. कंपनीच्या पोस्टपेड प्लस प्लॅनसह अनेक फायदे दिले जातात. यामध्ये सर्वात मोठा फायदा म्हणजे Netflix, Amazon Prime आणि Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळणं. जाणून घेऊया Jio च्या पोस्टपेड प्लस प्लान्सबद्दल.
JioPostpaid प्लस प्लॅनची किंमत 399 रुपयांपासून सुरू होते. या पोस्टपेड प्लानमध्ये 75GB डेटा दिला जातो. डेटा संपल्यानंतर, प्रति जीबी डेटासाठी 10 रुपये आकारले जातात. यामध्ये 200GB रोलओव्हर डेटा देण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये अनलिमिटेड कॉल्स आणि एसएमएसचे फायदे दिले जातात. या प्लॅनसह, Netflix, Amazon Prime आणि Disney + Hotstar चं सबस्क्रीप्शन विनामूल्य उपलब्ध आहे.
पुढील प्लॅन 599 रुपयांचा आहे. यामध्ये 100GB डेटा आणि 200GB रोलओव्हर डेटा देण्यात आला आहे. यामध्ये वरील योजनेचे सर्व फायदे दिले आहेत. म्हणजेच, अमर्यादित कॉल आणि SMS व्यतिरिक्त, तुम्हाला Netflix, Amazon Prime आणि Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.
Jio चा Rs 799 पोस्टपेड प्लस प्लॅन एक मिडएंड प्लॅन आहे. यामध्ये एकूण 150GB डेटा आणि 200GB रोलओव्हर डेटा देण्यात आला आहे. यामध्ये कुटुंबातील सदस्यासाठी दोन अतिरिक्त सिमकार्डही देण्यात आले आहेत. बाकीचे फायदे वरील योजनेप्रमाणेच आहेत.
पुढील प्लॅन 999 रुपयांचा आहे. यामध्ये 200GB डेटा देण्यात आला आहे. यानंतर, 500GB पर्यंतचा रोलओव्हर डेटा दिला जातो. प्रति जीबी डेटा 10 रुपये आकारला जातो. यामध्ये कुटुंबातील सदस्यासाठी तीन अतिरिक्त सिमकार्ड देण्यात आले आहेत. बाकीचे फायदे वरील योजनेप्रमाणेच आहेत.
शेवटचा प्लॅन 1499 रुपयांचा आहे. यामध्ये 300GB डेटा देण्यात आला आहे. यानंतर, डेटासाठी 10 रुपये प्रति जीबी शुल्क आकारले जाते. या प्लानमध्ये 500GB रोलओव्हर डेटा देण्यात आला आहे. यामध्ये कुटुंबातील सदस्यासाठी तीन अतिरिक्त सिम देखील देण्यात आले आहेत. बाकीचे फायदे वरील योजनेप्रमाणेच आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे