राज्यात झोननुसार मिळणार मोकळीक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

14

मुंबई, दि.१ मे २०२०: ३ तारखेला उठणाऱ्या लॉक डाऊननंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक झोन नूसार मोकळीक देण्यात येणार असल्याची घोषणा केली.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून त्यांनी फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधला.
लॉकडाऊन जरी संपत असला तरी, प्रत्येकाने तेवढीच काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने सावधानतेने आपलं पाऊल उचलणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, आपलं “अर्थचक्र रुतलयं , मोठा आर्थिक फटका बसणार, बेरोजगारी वाढणार हे जरी खरं असलं तरी प्रत्येक राज्याची किंवा राष्ट्राची खरी संपत्ती ही जनता आहे. जनता वाचली पाहिजे. नागरिक वाचले तर हा गाडा चिखलातून काढून पुढे नेऊ शकतो.असेही ते म्हणाले.

सध्या रेड झोनमध्ये आता काही करणं हिताचं होणार नाही. मुंबई आणि शेजारचा परिसर, पुणे, नागपूर यासारख्या रेड झोनमध्ये काही करणं आता हिताचं नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ऑरेंज झोनमध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये आता कोरोनाचे रुग्ण वाढत नाहीत, पण काही अॅक्टिव्ह केसे आहेत ते जिल्हे वगळता, उर्वरित जिल्ह्यांमध्ये काय करु शकतो, याचा विचार सुरु आहे. तर ग्रीन झोनमधल्या अटी-शर्ती हळूहळू काढत आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे प्रत्येकाने अधिक काटेकोरपणे काळजी घेणे गरजेचे आहे.कारण आपल कोरोनाच संकट संपलेलं नाही. गर्दी कराल, तर पुन्हा निर्बंध घालावे लागतील. त्यामुळे सर्वांनी काटेकोरपणे नियमांचे पालन करावे असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

याशिवाय शेतीवर कोणतीही बंधने नाहीत. “शेतकऱ्यांना बी-बियाणं, खतं पुरवली जातील. कृषी मालावर बंधनं नव्हती, माल वाहतूक मोकळी केली आहे. हळूहळू ही बंधनं उठवण्यात येणार आहेत. मात्र झुंबड झाल्यास ही बंधनं पुन्हा टाकली जातील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

कोणता जिल्हा कोणत्या झोनमध्ये?

रेड झोन : मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव, मुंबई उपनगर.

ऑरेंज झोन : रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड

ग्रीन झोन : उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा.

न्युज अनकट प्रतिनिधी: