ओडिसामध्ये मालगाडी रुळावरून घसरली; तीन प्रवासी ठार, तर अनेकजण जखमी

ओड़िसा, २१ नोव्हेंबर २०२२ : ओड़िसाच्या जाजपूर जिल्ह्यातील कोराई रेल्वेस्टेशनवर मालगाडीचा रुळावर घसरुन मोठा अपघात झाला. आज सकाळी ही दुर्घटना घडली. प्लॉटफॉर्मवर रेल्वेगाडीची वाट पाहत असलेल्या प्रवाशांवर मालगाडी उलटली. यामध्ये तीन प्रवासी जागीच ठार झाले असून, अनेकजण जखमी झाले आहेत.

आज सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी मालगाडी रुळवरून घसरली. उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडत मालगाडीने तिकीट खिडकीला धडक मारली. भुवनेश्वरला जाण्यासाठी गाडीची वाट पाहत उभे असलेले प्रवासी या अपघातात जखमी झाले आहेत.

मालगाडीची एक बोगी वेगाने पलटी होत ब्रीजला धडकली. या अपघातानंतर कोसळलेल्या छताखाली अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी इतर प्रवाशांनी धाव घेतली. यातील जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातातील जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा