जालना ७ जानेवारी २०२४ : जालना जिल्हा सध्या गुन्हेगारीचा अड्डा बनाला की काय असे चित्र निर्माण झाले आहे. आज सायंकाळी जालना शहरापासून जवळच असलेल्या पीर पिंपळगाव शिवारात मित्रां-मित्रा मध्ये झालेला वाद, शाब्दिक बाचाबाची चे पर्यवसान मारामारीत झाले. या मारामारीत २३ वर्षीय दिलिप हरिभाऊ कोल्हे या तरुणावर आरोपी अरविंद लक्ष्मण शेळके राहणार पीर पिपळगाव ता.जिल्हा जालना, याने खाण्यासाठी गुटख्याची पुडीची मागणी केली. शाब्दिक वाद वाढतच गेला आणि त्याचे रूपांतर चक्क हाणामारी मध्ये झाले. या हाणामारीत दिलीप हरिभाऊ कोल्हे यांच्या छातीत अरविंद लक्ष्मण शेळके यांने चाकू भोसकला. त्यानंतर अरविंद लक्ष्मण शेळके व त्याचे तीन ते चार साथीदार फरार झाले असल्याची प्राथमिक माहीती समोर येत आहे. विशेष म्हणजे चार ही मित्र दारू प्यायलेले होते असे समजते.
जखमी युवक दिलीप कोल्हे यास गावकऱ्यांनी जालना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चंदनझीरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन या मयत तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालयात शविछेदन करण्याकरिता दाखल केले. या घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी चंदनझीरा पोलीस ठाण्याकडुन दोन पथके तैनात करण्यात आली असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल अशी माहिती चंदनझीरा पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे. मात्र या झालेल्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जालन्यात सध्या लूटमारीच्या घटना तसेच खूनाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून जालना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थे बाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्ह्यात विशेष करून जालना शहरात गुन्हेगारी वृत्तीने डोके वर काढले असून सर्वसामान्य नागरिकांना आता शहरात संचारण्यात सुद्धा भीती वाटत असल्याचे व्यापारी वर्ग तसेच प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी