13 कोटींवरून 107 कोटींवर… कशी झाली IPL ची क्रेझ ‘मेगा’

पुणे, 14 जून 2022: आयपीएलच्या पुढील पाच हंगामांसाठी (2023-27) टीव्हीचे हक्क डिस्ने स्टारने आणि डिजिटल हक्क रिलायन्सने (व्हायकॉम) विकत घेतले आहेत. डिजनी स्टारने 23,575 कोटी रुपयांना टीव्हीचे हक्क विकत घेतले, तर वायकॉम 18 ने 20,500 कोटी रुपयांना डिजिटल अधिकार विकत घेतले. मात्र, बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

टीव्हीवर आयपीएल सामने प्रसारित करणारी डिजनी स्टार प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला 57.5 कोटी रुपये देणार आहे. त्याच वेळी, डिजिटल प्लॅटफॉर्मवर आयपीएल सामने स्ट्रीम करणारी Viacom 18 प्रत्येक सामन्यासाठी BCCI ला 48 कोटी रुपये देणार आहे. त्यानुसार एका आयपीएल सामन्याची किंमत 105.5 कोटी इतकी आहे.

आयपीएलचा पहिला हंगाम 2008 मध्ये आयोजित करण्यात आला होता, जो सोनी टीव्हीवर प्रसारित केला गेला. यानंतर, सोनीने 2017 च्या हंगामापर्यंत आयपीएल सामने प्रसारित केले. सोनीने हा 10 वर्षांचा करार एकूण 8200 कोटी रुपयांना केला होता आणि BCCI ने मीडिया हक्कांद्वारे प्रति सामन्यासाठी 13.6 कोटी रुपये कमावले होते.

त्यानंतर 2017 मध्ये स्टार इंडियाने 16,347 कोटी रुपयांना आयपीएल मीडिया हक्क विकत घेतले. या दरम्यान स्टारने 2018-22 च्या हंगामात बीसीआयला 55 कोटी रुपये दिले. आता 14 वर्षे आणि 15 सीझननंतर प्रति सामन्याची किंमत 107.5 कोटी रुपये झाली आहे.

आयपीएल मधील वाढ

2008 सीझन 1: 13.6 कोटी/सामना

2018, सीझन 11: 55 कोटी/सामना

2023, सीझन 16: 107.5 कोटी*

बोर्डाची कमाई 44 हजार कोटींच्या पुढे

2023 ते 2027 या पाच हंगामातील एकूण 410 आयपीएल सामन्यांसाठी पॅकेज-ए 23,575 कोटी रुपयांना विकले गेले, जे प्रति सामना 57.5 कोटी रुपये आहे. त्याचवेळी पॅकेज-बी-20 500 कोटी रुपयांना विकले गेले. अशाप्रकारे, एकूणच बीसीसीआयने दोन पॅकेजेस विकून 44,075 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

जगातील दुसरी सर्वात महाग लीग

इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल)ला मागं टाकून आयपीएल आता जगातील दुसरी सर्वात मोठी लीग बनली आहे. EPL च्या एका सामन्याची कमाई $11 दशलक्ष (85.83 कोटी) आहे. कमाईच्या बाबतीत फक्त अमेरिकन फुटबॉल लीग (NFL) IPL च्या पुढं आहे. एका NFL सामन्याची कमाई $17 दशलक्ष (सुमारे 132.70 कोटी) आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा