लखनौ ते चेन्नई, कोणता खेळाडू कोणत्या संघात? जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

IPL 2022, Mega Auction, 13 फेब्रुवारी 2022: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या मेगा लिलावाचा पहिला दिवस अतिशय रोमांचक होता. शनिवारी पहिल्या दिवसाच्या लिलावात देशी-विदेशी खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. भारतीय खेळाडूंमध्ये इशान किशन, दीपक चहर आणि श्रेयस अय्यर यांना चांगलेच महागात विकले गेले. त्याचबरोबर निकोलस पूरन, वानिंदू हसरंगा हे परदेशी खेळाडू दिसले.

चेन्नई सुपरकिंग्स :

चेन्नई सुपकिंग्सने 10 खेळाडूंची खरेदी केली. त्यांच्याकडे आता 20 कोटी 45 लाख रुपये शिल्लक आहेत. या संघाने 2 परदेशी खेळाडूंची खरेदी केली आहे. या संघाकडे आता ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, मोइन अली, महेंद्र सिंह धोनी, रविंद्र जडेजा, दीपक चहर, ड्वेन ब्रावो, रॉबिन उथप्पा, केएम आसिफ, तुषार देशपांडे हे खेळाडू आहेत.

दिल्ली कॅपिटल्स :

दिल्ली कॅपिटल्सने 13 खेळाडूंची खरेदी केली आहे. त्यांच्याकडे आता 16 कोटी 50 लाख रुपये शिल्लक आहे. या संघाने 4 विदेशी खेळाडूंची खरेदी केली आहे. या संघात आता डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिशेल मार्श, ऋषभ पंत, सरफराज खान, केएस भरत, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, कमलेश नागरकोटी, मुस्तफिजुर रहमान, अश्विन हेब्बार हे खेळाडू असतील.

गुजरात टायटन्स :

या संघाने एकूण 10 खेळाडूंची खरेदी केली आहे. त्यांच्याकडे आता 18 कोटी 85 लाख रुपये शिल्लक आहेत. या संघाने 4 परदेशी खेळाडूंची खरेदी केली आहे. या संघाकडे आता शुभमन गिल, जेसन रॉय, अभिनव मनोहर, हार्दिक पांड्या, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्यूसन, आर साई किशोर, नूर अहमद यांचा समावेश असणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स :

कोलकाता नाईट रायडर्सने शनिवारी 9 खेळाडूंची खरेदी केली. त्यांच्याकडे आता 12 कोटी 65 लाख रुपये शिल्लक आहेत. या संघाने 3 परदेशी खेळाडूंची खरेदी केली. या संघाकडे आता व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयश अय्यर, शेल्डन जॅक्सन, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती हे खेळाडू असणार आहेत.

लखनऊ सुपर जायंट्स :

या संघाने शनिवारी एकूण 11 खेळाडूंची खरेदी करण्यात आली. त्यांच्याकडे आता 6 कोटी 90 लाख रुपये शिल्लक आहेत. त्यांनी 4 परदेशी खेळाडूंची खरेदी केली. या संघात आता केएल राहुल, क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, दीपक हुड्डा, मार्कस स्टोइनिस, क्रुणाल पांड्या, जेसन होल्डर, रवि बिश्नोई, अवेस खान, मार्क वुड, अंकित राजपूत हे खेळाडू असतील.

मुंबई इंडियन्स :

मुंबई इंडियन्सने शनिवारी 8 खेळाडूंची खरेदी केली. या संघाकडे आता 27 कोटी 85 लाख रुपये शिल्लक आहेत. मुंबई इंडियन्सने 2 विदेशी खेळाडूंची खरेदी केलीय. या संघात आता रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, कीरोन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, एम आश्विन, बासिल थंपी हे खेळाडू असतील.

पंजाब किंग्स :

पंजाब किंग्सने शनिवारी 11 खेळाडू खरेदी केली. या संघाकडे आता 28 कोटी 65 लाख रुपये शिल्लक आहेत. या संघाने दोन परदेशी खेळाडूंची खरेदी केली आहे. या संघात शिखर धवन, मयांक अग्रवाल, जॉनी बेयरस्टो, जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंह, शाहरुख खान, हरप्रीत बराड, कगिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंह, ईशान पोरेल हे खेळाडू असतील.

राजस्थान रॉयल्स :

राजस्थान रॉयल्सने शनिवारी 11 खेडाळूंची खरेदी केली. त्यांच्याकडे आता 12 कोटी 15 लाख रुपये शिल्लक आहेत. या संघाने 3 विदेशी खेळाडूंची खरेदी केली. तर संघात आता देवदत्त पडिक्कल, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, जोस बटलर, शिमरोन हेटमायर, रियान पराग, आर आश्विन, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, केसी करियप्पा हे खेळाडू असतील.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू :

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शनिवारी 11 खेळाडूंची खरेदी केली. त्यांच्याकडे आता 9 कोटी 25 लाख रुपये शिल्लक आहेत. या संघाने 4 परदेशी खेळाडूंची खरेदी केली. त्यांच्याकडे आता फाफ डु प्लेसिस, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, वनिन्दू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवुड, मोहम्मद सिराज, आकाश दीप हे खेळाडू असतील.

सनरायजर्स हैदराबाद :

सनरायजर्स हैदराबाद या संघाने शनिवारी 13 खेळाडूंची खरेदी केली. त्यांच्याकडे आता 20 कोटी 15 लाख रुपये शिल्लक आहेत. या संघाने 2 विदेशी खेळाडू घेतले. तर आता या संघात अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विल्यमसन, निकोलस पूरन, प्रियम गर्ग, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, जे सुचित, श्रेयश गोपाल, कार्तिक त्यागी, टी नटराजन आणि उमरान मलिक हे खेळाडू असतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा