मस्जिदींमधून अजान, नमाजपठण मात्र घरीच

बीड :मुस्लिम समाजात पवित्र मानला जाणारा रमजानचा महिना येत्या दोन ते तीन दिवसांत सुरू होत आहे. या महिन्यात मुस्लिम बांधवांना नमाजपठणाची आणि रोजे सोडण्याची वेळ माहिती व्हावी म्हणून मस्जिदींमधून लाऊड स्पिकर वापरण्याची परवानगी प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. मस्जिदींमध्ये जाण्याऐवजी नागरिकांनी घरातच नमाजपठण करून रोजे सोडावेत असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
या संदर्भात मुस्लीम धर्मगुरुंची जिल्हाधिकारी कार्यालयात, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यानुसार, मस्जिदींमध्ये लाऊड स्पीकर वापरण्यासाठी पोलीस स्टेशनमधून परवानगी घ्यावी आणि न्यायालयाने ठरवून दिलेल्या, सकाळी ६ ते रात्री १० या वेळेतच स्पिकरचा वापर करावा असे सांगण्यात आले आहे. तर सर्व सर्व मुस्लिम बांधवांनी अटी व नियमांचे पालन करून धार्मिक कार्यक्रम पार पाडावेत आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा