गोल पोस्ट महाराष्ट्र ऑक्टोबरपासून कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सकाळी व रात्री अशा दोन सत्रात

ऑक्टोबरपासून कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सकाळी व रात्री अशा दोन सत्रात

कोल्हापूर, ३ ऑगस्ट २०२३ : कोल्हापूर-मुंबई मार्गावर दररोज विमानसेवा सुरू होणार आहे. तशा हालचाली सुरू असून, ऑक्टोबर महिन्यापासून या मार्गावर दररोज विमानसेवा सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कोल्हापूर-मुंबई मार्गावर सध्या आठवड्यातून चार दिवस सेवा सुरू आहे.

ही सेवा नियमित करण्याची मागणी सातत्याने होत आहे. केवळ दैनंदिनच नव्हे, तर सकाळी आणि रात्री अशा दोन सत्रांत विमानसेवा सुरू करण्याची गरज आहे. मात्र तांत्रिक कारणास्तव अद्याप या मागणीला यश येताना दिसत नाही. सध्या असलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा दररोज सुरू करण्यासाठी हालचाली सुरू आहे.

ऑक्टोबर महिन्यापासून प्रत्यक्ष आठवड्यातून सातही दिवस कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा उपलब्ध होईल. तांत्रिक कारणास्तव जून महिन्यापुरती ही विमानसेवा बंद करण्यात आलेली कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा बंदच आहे. पण लवकरच ही सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. असे सांगण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version