गोल पोस्ट महाराष्ट्र हॉटेलमधून ‘फूड डिलिव्हरी’ला राज्य सरकारची परवानगी

हॉटेलमधून ‘फूड डिलिव्हरी’ला राज्य सरकारची परवानगी

मुंबई : जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरू ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहोचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि ‘कोरोना’ सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासळीची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे नागरिकांना हे पदार्थ खरेदी करता येतील.
कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत. मात्र, विक्री आणि खरेदी करणाऱ्या दोघांनीही ‘कोरोना’संदर्भात आवश्यक स्वच्छता, सुरक्षितता बाळगायची आहे. गर्दीमुळं होणारा संसर्ग टाळून खरेदी करायची आहे, असं पवार यांनी सांगितले.

error: Content is protected !!
Exit mobile version