नवी दिल्ली, १ डिसेंबर २०२२ : भारत गुरुवारपासून एका वर्षासाठी जगातील सर्वांत आर्थिकदृष्ट्या संपन्न देशांचा समूह असलेल्या ‘जी-२०’च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहे. या काळात भारताला आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागतिक कार्यक्रमात योगदान देण्याची अनोखी संधी मिळेल. पंतप्रधान कार्यालयाने प्रचलित केलेल्या निवेदनानुसार, ‘जी-२०’ हे आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचे प्रमुख व्यासपीठ आहे, जे जागतिक ‘जीडीपी’च्या ८५ टक्के, जागतिक व्यापाराच्या ७५ टक्क्यांहून अधिक आणि जगातील दोन तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते.
पुढील वर्षी ‘जी-२०’ शिखर परिषद होणार आहे.
‘जी-२०’च्या अध्यक्षपदाच्या काळात, भारत देशातील ५५ ठिकाणी ३२ वेगवेगळ्या क्षेत्रांत सुमारे २०० बैठका आयोजित करेल. पुढील वर्षी होणारी ‘जी-२०’ शिखर परिषद ही भारताने आयोजित केलेल्या सर्वोच्चस्तरीय बैठकांपैकी एक असेल. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘जी-२०’ची पहिली बैठक उदयपूरमध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबरच्या सुरवातीला भारताच्या अध्यक्षतेखाली ‘जी-२०’ लोगो, थीम आणि वेबसाइट लाँच केली होती. त्यांच्या लोगोमधील कमळाचे फूल हे भारताच्या प्राचीन वारसा, श्रद्धा आणि विचारसरणीचे प्रतीक आहे.
भारताने ‘जी-२०’चे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर, केंद्र सरकारद्वारे संरक्षित केलेल्या शंभर स्मारके, ज्यात ‘युनेस्कोच्’या जागतिक वारसा स्थळांचा समावेश आहे. या स्मारकांमध्ये दिल्लीतील हुमायूनचा मकबरा आणि जुना किल्ला, गुजरातमधील मोढेरा सूर्यमंदिर, ओडिशातील सूर्यमंदिर, बिहारमधील शेरशाहचा मकबरा आणि राजगीरमधील नालंदा विद्यापीठाचे अवशेष व प्राचीन वास्तू आणि इतर स्मारके, बंगालची राजधानी कोलकाता येथील मेटकाल्फ हॉल यांचा समावेश आहे. मुद्रा भवन, बॅसिलिका ऑफ बाम जीझस आणि गोव्यातील चर्च ऑफ लेडी ऑफ रोझरी, टिपू सुलतानचा पॅलेस आणि कर्नाटकातील गोल गुम्बाझ आणि मध्य प्रदेशातील सांची बौद्ध स्मारके आणि ग्वाल्हेर किल्ला. यादरम्यान, या स्मारकांवर ‘जी-२०’ लोगोही हायलाइट केला जाईल. स्मारकावर किती आकारमानाचा लोगो लावण्यात येणार आहे त्या ठिकाणाचे स्वरूप आणि डिझाइन यावर अवलंबून असेल. भारतात ‘युनेस्को’ची ४० जागतिक वारसा स्थळे आहेत आणि बहुतेक सांस्कृतिक स्थळे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) अंतर्गत येतात.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड