‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’ कडून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना फळ वाटप

पुणे, २५ एप्रिल २०२०: कोरोनाचे संकट पूर्ण जगभर पसरलेले आहे. याचा पूर्ण जगात हाहाकार माजला आहे. यातून भारतात देखील काही वेगळी परिस्थिती नाही. या जागतिक महामार्ग च्या काळात असंख्य वैद्यकीय कर्मचारी रुग्णांच्या सेवेत आपले सर्वस्व अर्पण करत आहेत. परंतु एवढे सर्व करून देखील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील सुरळीतपणे होताना दिसत नाही.

या परिस्थितीची जाणीव राखत ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’ ने पुढाकार घेतलाय. या अनुषंगाने पुणे शहरातील औंध ऊरो जिल्हा रुग्णालय येथे सर्व डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना फळ वाटप करण्यात आले. औंध येथील रुग्णालयात पुणे शहरातील कोरोनाचे रुग्ण कोरंटाईन केले गेले आहेत. त्यामुळे येथील वैद्यकीय कर्मचारी व डॉक्टर आपले प्राण धोक्यात घालून त्यांचे कर्तव्य पार पाडत आहेत.

श्री भगवान काकने ( अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक) आणि सौ. आहेर मॅडम (आहार तज्ञ) यांच्या उपस्थितीत हे फळ वाटप करण्यात आले. समाजाविषयी डॉक्टर सर्व कर्मचारी जे कर्तव्य पार पाडत आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’ ने केला आहे. तसेच सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

इतकेच नव्हे तर पुणे शहरातील सर्व भागांमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना देखील अशा प्रकारचे फळवाटप करण्यात आले. तब्बल ५०० किलो फळांचे वाटप पूर्ण शहरात आणि रुग्णालयामध्ये करण्यात आले. ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’ ने समाज बांधवांना देखील अशा मदतीचे आव्हान केले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा